नंदुरबार

यात्रेच्या निमित्ताने कालिका मातेची महाआरती आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न

यात्रेच्या निमित्ताने कालिका मातेची महाआरती आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न

तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भरणारा तळोदा येथील कालिकामाता यात्रेला उत्सवात सुरुवात झाली सकाळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कालिकामाता मंदिरावर मातेची महाआरती करण्यात आली.


याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक तथा गटनेता शिरीष माळी,जितेंद्र सूर्यवंशी, नितीन पाडवी, विलास डामरे, सुभाष जैन, सुभाष चौधरी, नारायण ठाकरे, हंसराज महाले,आनंद सोनार,संजय पटेल,अंबालाल साठे, योगेश पाडवी,विवेक पाडवी, राजू पाडवी,पंकज राणे,संजय वाणी, दिपक कलाल, भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक तथा गटनेता शिरीष माळी,जितेंद्र सूर्यवंशी, नितीन पाडवी, विलास डामरे, सुभाष जैन, सुभाष चौधरी, नारायण ठाकरे, हंसराज महाले,आनंद सोनार,संजय पटेल,अंबालाल साठे, योगेश पाडवी,विवेक पाडवी, राजू पाडवी,पंकज राणे,संजय वाणी, दिपक कलाल,गोविंदा पाडवी धीरज माळी, योगेश गुरव आशुतोष, पटेल राहुल पाटील,कालू पाडवी गणेश सोनार,हितेंद्र सोनार,नीला मेहता,आदी उपस्थित होते.
सुरुवातीला आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मातेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आमदारांकडे उपस्थित भाविकांनी मातीच्या मंदिराच्या जीर्णोदरा संदर्भात प्रयत्न करण्याची मागणी केली यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी साऱ्यांच्या सहभागातून आमदारांच्या जीर्णोद्धार लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे स्थानिक पर्यटन विकासाच्या निधी देखील मंदिरासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपस्थित त्यांना दिले. दरम्यान, यात्रेसाठी कायमस्वरूपी जागा नसल्याने यात्रा दरवर्षी फिरत्या ठिकाणी भरावी लागत आहे. गावाबाहेर यात्रा जात असल्याने गावातील स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याकडे देखील आमदारांचे यावेळी उपस्थित त्यांनी लक्ष वेधले यावर आमदार राजेश पाडवी यांनी यासंदर्भात देखील ठोस निर्णय घेण्याचे सुचवून पुढच्या वर्षापासून यात्रेसाठी सर्व सहमतीने कायमस्वरूपी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *