नंदुरबार

ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न सुंदरसिंग वसावे

ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
सुंदरसिंग वसावे

नंदुरबार, दिनांक 13 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ साजरा केला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून, 13 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर, मेळावा आणि रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्ये:

  • कायदेशीर मार्गदर्शन: शासकीय अभियोक्ता श्रीमती खत्री मॅडम आणि डी. एस. बिरारे यांनी ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम 2010’ चे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
  • तज्ज्ञांचे मार्गदर्शन: बारकू पाटील, प्रतापराव चव्हाण, के. डी. गिरासे आणि सेवानिवृत्त प्राध्यापक इंदवे सर यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्क आणि कल्याणाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
  • रक्तदान मोहीम: सामाजिक बांधिलकी जपत याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात नागरिक आणि समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

आयोजन आणि व्यवस्थापन:
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी सर्व रक्तदात्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास देशमुख यांनी केले, तर नियोजनाची जबाबदारी शंकर महाजन यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदाने विशेष सहकार्य केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *