
प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार केंद्राचा आज दिव्य भूमिपूजन सोहळा
नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान संचलित ओम शांती केंद्र नंदुरबार येथील निर्माणाधीन भव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा आज गुरुवार दि. 5 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शहरात सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांचा विकास करण्याचे कार्य प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अविरतपणे करीत आहे.राजयोगाच्या माध्यमातून जीवनात मूल्ये अंगीकारून स्वतः, कुटुंब, समाज आणि देश यांना श्रेष्ठ बनविण्याच्या कार्याला अधिक वेग देण्यासाठी या पावन भूमीचे भूमिपूजन करण्यात येत आहे. परमात्म्याच्या या कार्याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून माउंट आबू राजस्थान येथील राजयोगी भ्राता रूपेशभाई, पुणे विभागाच्या प्रमुख
राजयोगिनी बी. के. पारू दीदीजी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा होणार आहे.
आज गुरुवार दि. 5 मार्च रोजी सकाळी दहा वाजता प्लॉट नं. 20, शिक्षक कॉलनी, जिजामाता कॉलेजच्या मागे, नंदुरबार येथे होईल. भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती आयोजक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय परिवार,नंदुरबार आणि
शहादा सेवा केंद्र प्रमुख
बी. के. विद्या दीदी, तसेच नंदुरबार सेवा केंद्र प्रमुख बी.के.योगिता दीदी,मीडिया समन्वयक महादू हिरणवाळे यांनी केले आहे.
- 0
- 0
- 0
- 0





