नंदुरबार

लुपिन फाउंडेशनमार्फत ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरण

लुपिन फाउंडेशनमार्फत ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरण
तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो
लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन तळोदा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “सुधारित कापूस आदर्श पद्धत” प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध शाश्वत शेतीविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अल्प सहभाग रक्कम घेऊन ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरण करण्यात आले.
   

                   या उपक्रमांतर्गत तळोदा पीयू परिसरातील गोपालपूर, रोझवा,तळवे, नर्मदा नगर, मोड, गोपाळपूर, नवागाव, सिलिंगपूर, खरवड, तऱ्हावद, रेवानगर, लाखापूर, धवळीविहीर, सोमावल,धानोरा, रांझनी, पाडलपुर तसेच परिसरातील इतर गावांतील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्यात आला. सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तसेच बदलत्या हवामानाचा विचार करता शाश्वत व कार्यक्षम पाणी व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


                       कापूस पिकामध्ये कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. या पद्धतीमुळे पाण्याची लक्षणीय बचत, उत्पादन खर्चात घट आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठीही ही पद्धत प्रभावी ठरणार आहे.
या अनुषंगाने फाउंडेशनमार्फत ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरण करून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. चालू हंगामात एकूण १०८ शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सदर उपक्रम “सुधारित कापूस आदर्श पद्धत” प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील, जिल्हा प्रकल्प समन्वयक चंदन टोक्षा तसेच तळोदा पीयू व्यवस्थापक धनसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला. यावेळी पियूतील उपस्थित सर्व कर्मचारी उपस्थित होते.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *