नंदुरबार

सागवानी लाकडाचा अवैध साठा जप्त बिलगांव रेंज कर्मचाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

सागवानी लाकडाचा अवैध साठा जप्त बिलगांव रेंज कर्मचाऱ्यांची धडाकेबाज कारवाई
धडगाव |सप्त नगरी न्यूज

धडगाव तालुक्यातील बिलगाव वनक्षेत्रातील भुषा परिमंडळातील नियतक्षेत्र साव-या कंपाऊंड नंबर ७६ मौजे -बिलगावचा निलदयपाडा यात जंगल भागात अवैधरित्या साग दांड्याचा साठा तस्करीच्या उद्देशाने लपवून ठेवलेले जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                          गुप्त माहितीच्या आधारे बिलगाव रेंज स्टाफसह गस्त करीत असतांना ठिक ठिकाणी साग दांड्या ४४  नग किंमत २८ हजार सहाशे ६७५ रुपये व साग चौपट नग-एक किंमत १ हजार ५० असा एकूण १.१८९  घनमीटर असा २९ हजार ७७५ रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.सदर मुद्देमाल वनकर्मचारी यांनी अत्यंत दुर्गम भागातून सुमारे दोन तीन किलोमीटर पायी वाटचाल करीत स्वतः शिरओझ्याने रस्त्यावर वाहतूक करून खाजगी वाहनाने रात्री उशिरा धडगाव टिंबर डेपोवर आणून पावतीने जमा केला. सदर गुन्हयाबाबत भरतसिंग परदेशी वनपाल भुषा यांनी त्यांच्याकडील वनगुन्हा भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ ( १) ड, इ , फ अन्वये नोंदविला. सदर गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केली.सदर कारवाई वनसंरक्षक धुळे श्रीमती निनु सोमराज , उपवनसंरक्षक.संतोष सस्ते नंदुरबार, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर, सहायक वनसंरक्षक एस.डी.साळुंके (रो. ह. यो.) अक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली व लक्ष्मीकांत शेंडगे वनक्षेत्रपाल बिलगाव (प्रादेशिक) व वनक्षेत्रपाल अक्राणी (प्रादेशिक)श्रीमती चारुशीला काटे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल.(प्रशिक्षणार्थी) प्रथमेश ढाणे, वनपाल भुषा भरत सिंग परदेशी, वनपाल माळ प्रतिभा बोरसे,वनरक्षक मंगेश वळवी, अशोक पावरा, उमेश पावरा,पुनम पावरा, रेखा पावरा,मनिषा पावरा,जोली वळवी, प्रमिला पावरा गिरधर पावरा, दिनेश वसावे, वैशाली पाडवी,वनमजूर जाण्या पावरा यांनी केली. पुढील तपास भुषा चे वनपाल भरतसिंग परदेशी हे करीत आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *