नंदुरबार

टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षणातून ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकतेची संधी

टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षणातून ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकतेची संधी

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. १७ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून, विशेषतः मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ग्रामीण युवक-युवतींना पूरक उपजीविकेचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

या प्रशिक्षणाचे आयोजन महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था आणि ATMA नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे त. त., ता. शहादा, जि. नंदुरबार येथील नवोपक्रम व इनक्युबेशन कक्ष यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाला चालना देण्यात आली आहे.

प्रशिक्षणामध्ये पर्यावरणपूरक टेराकोटा मणी तयार करणे, पारंपरिक दागिन्यांची डिझाइन व निर्मिती, उत्पादनाची गुणवत्ता, बाजारपेठेतील संधी आणि उद्योजकतेचे प्राथमिक मार्गदर्शन अशा विविध घटकांवर प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) स्वरूपात मार्गदर्शन केले जाणार आहे.

ग्रामीण भागातील युवक-युवती व महिलांना शाश्वत उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध करून देत स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कौशल्य, सर्जनशीलता आणि उद्योजकता यांची सांगड घालत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ATMA #collectorofficenandurbar #youthentrepreneurs

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *