
अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न

मुंबई|सप्त नगरी न्यूज ब्युरो
अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांतील प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या प्रगतीस गती देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. आगामी काळात या आराखड्याच्या माध्यमातून विकासकामांना अधिक वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीस पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्यावतीने सादरीकरण केले.
अहिल्यानगर #Ahilyanagar #वार्षिकनियोजनआराखडा #मुंबई #Mumbai #DevendraFadanvis
- 0
- 0
- 0
- 0





