अकोला नंदुरबार बुलढाणा

सीएमआरसी प्रशिक्षण व अभ्यास दौरा : सक्षम व्यवस्थापनातून सक्षम महिला

CMRC प्रशिक्षण व अभ्यास दौरा : सक्षम व्यवस्थापनातून सक्षम महिला

नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नंदुरबार अंतर्गत कार्यरत अक्काराणी व प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) कार्यकारिणी सदस्यांची क्षमता वृद्धिंगत करणे, संस्थात्मक व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे तसेच इतर जिल्ह्यांतील यशस्वी महिला उपक्रमांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने दिनांक ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कार्यकारिणी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यात तेजस्विनी भवन, लोकसंचालित साधन केंद्र (CMRC), अकोला येथे सखोल प्रशिक्षण देण्यात आले तसेच बुलढाणा जिल्ह्यातील यशस्वी महिला सक्षमीकरण उपक्रमांचा अभ्यास करण्यात आला.

दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नंदुरबार येथून अकोला येथे प्रस्थान करण्यात आले. दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तेजस्विनी भवन, अकोला येथे CMRC उभारणी प्रक्रिया, इमारत बांधकाम, खातेपद्धती, व्यवसाय आराखडा (Business Plan), बैठक व्यवस्था, कर्मचारी व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विभागीय सल्लागार मा. श्री. शैलेश पाटील (नाशिक विभाग) यांनी माविमची उद्दिष्टे, महिला सक्षमीकरणाची संकल्पना, CMRC व RGB रचना, कार्यकारिणीचे अधिकार व कर्तव्ये, ऑडिट प्रक्रिया तसेच निर्णय घेण्याची पद्धत यावर सखोल व मार्गदर्शक माहिती दिली.

दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी Business Plan तयार करणे, वनधन आधारित उत्पादने तसेच CMRC Documentation या विषयांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.

बुलढाणा जिल्हा अभ्यास दौरा:
दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील विविध महिला सक्षमीकरण उपक्रमांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ३% राखीव निधीचा प्रभावी वापर, नवतेजस्विनी विक्री केंद्रे, महिला बचत गटांना मार्जिन मनी, तसेच अगरबत्ती, गणपती मूर्ती व लोणचे उत्पादन प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या उपक्रमांमुळे महिलांना नियमित रोजगार व आर्थिक स्थैर्य मिळत असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.

सदर कार्यकारिणी प्रशिक्षण व अभ्यास दौरा कार्यकारिणी सदस्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. या प्रशिक्षणामुळे CMRC व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, नियोजन क्षमता व संस्थात्मक जबाबदाऱ्या याबाबत स्पष्टता निर्माण झाली असून, नंदुरबार जिल्ह्यातील लोकसंचालित साधन केंद्रांचे कार्य अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे राबविण्यास निश्चितच मदत होणार आहे.

Mavim Nandurbar

maavim #collectorofficenandurbar #WomenEmpowerments

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *