पत्रकारांना जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांची सुरक्षा व्यवस्था काढावी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची मागणी मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला असून मुख्यमंत्री […]
नंदुरबार
शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी
शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी नंदुरबार, दि. 25 जून :मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या समुदाय आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ७० हून अधिक रुग्णांची […]
तळोदा तालुक्यात अवकाळी पावसामुळे बोरवणपाडा परिसरातील संपर्क मार्ग बंद ;प्रशासन परिस्थितीवर नियंत्रणासाठी सतर्क
तळोदा तालुक्यात अवकाळी पावसामुळे बोरवणपाडा परिसरातील संपर्क मार्ग बंद ;प्रशासन परिस्थितीवर नियंत्रणासाठी सतर्क नंदुरबार, दिनांक 23 जून :तळोदा तालुक्यात मंगळवार, दिनांक 23 जून रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे खर्डी खुर्द ते बोरवणपाडा दरम्यानच्या नाल्याला पूर आल्याने परिसरातील सुमारे 10 गाव-पाड्यांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून कोणतीही जीवित अथवा पशुहानी झालेली […]
तळोदा वाढीव मालमत्ता कर विरोधात नागरिकांचा वतीने शिवसेनेत तर्फे पालिकेवर मोर्चा
तळोदा वाढीव मालमत्ता कर विरोधात नागरिकांचा वतीने शिवसेनेत तर्फे पालिकेवर मोर्चा करवाढ रद्द करण्याची मालमत्ता धारकांची मागणी तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील नगरपालिकेकडून २०२५-२६ या वर्षासाठी आकारण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाढीव करवाढ रद्द करावी या मागण्यासाठी शिवसेना (शिदे गट) शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ताधारकांची बैठक […]
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तळोद्यात स्तुत्य उपक्रम! ग्रामपंचायत अधिकारी हर्षल सोनवणे यांच्याकडून ४८ शाळांतील विद्यार्थ्यांना १००० ‘बालमित्र’ पुस्तके भेट
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तळोद्यात स्तुत्य उपक्रम!ग्रामपंचायत अधिकारी हर्षल सोनवणे यांच्याकडून ४८ शाळांतील विद्यार्थ्यांना १००० ‘बालमित्र’ पुस्तके भेट तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा भाषिक विकास व्हावा आणि एक ज्ञानसंपन्न पिढी घडावी या उदात्त हेतूने तळोदा येथे एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी हर्षल नानाभाऊ सोनवणे आणि त्यांच्या पत्नी. […]
25 जूनला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक
25 जूनला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक नंदुरबार, दिनांक 22 जून (जिमाका):शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली असून ही बैठक येत्या गुरुवार, दिनांक 25 जून 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नियोजन भवन सभागृह येथे पार […]
सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन!शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करा -बिरसा फायटर्सची मागणी सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन!
शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करा -बिरसा फायटर्सची मागणीसातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन! सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन! नंदुरबार :- राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण १००% कर्जमाफी करा, सातबारा कोरा करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे […]
शेजवा शाळेत योग दिन उत्साहात साजरा
शेजवा शाळेत योग दिन उत्साहात साजरा नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते.यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना योग अभ्यासाविषयी व आपले शरीर निरोगी,तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे.म्हणून तो दररोज व […]
कुपोषणमुक्त व निरोगी गावांच्या दिशेने ठोस पाऊल! माळ गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष दौरा
कुपोषणमुक्त व निरोगी गावांच्या दिशेने ठोस पाऊल! माळ गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष दौरा धडगाव | दि. 19 जून नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण व आरोग्यविषयक उच्च जोखीम असलेल्या गावांसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी धडगाव तालुक्यातील माळ गावाला भेट देऊन ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य व महिला-बालविकास विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी […]
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी;खरीप हंगामात 1 हजार हेक्टरवर राळा व वरई पिकाची लागवड करणार
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी;खरीप हंगामात 1 हजार हेक्टरवर राळा व वरई पिकाची लागवड करणार नंदुरबार, दिनांक 19 जून (जिमाका):आकांक्षित जिल्हा अंतर्गत सन 2026-27 च्या जिल्हा वार्षिक विकास आराखडा योजनेतून जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी चालू खरीप हंगाम 2026-27 मध्ये तृणधान्य (Minor Millets) पिकाच्या क्षेत्रात वाढ करणे आणि पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व वाढवणे, या उद्देशाने ही विशेष मोहीम […]










