नंदुरबार

जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटीजिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी

जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर

6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी
जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी

नंदुरबार, दि. 03 नोव्हेंबर सप्त नगरी न्यूज ब्युरो:
नंदुरबार जिल्ह्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 9 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुटीत बदल करून जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 16 जानेवारी, 1958 रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांचा वापर करून नंदुरबार जिल्ह्यासाठी सन 2026 मध्ये स्थानिक सुट्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशीनिमित्त स्थानिक सुटी निश्चित करण्यात आली होती. मात्र, या सुटीत बदल करून दिवाळीनिमित्त 9 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

ही सुधारित स्थानिक सुटी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू राहणार आहे.असेही जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *