नंदुरबार

दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल; पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश 

दिल्ली स्थित सिल्वरझोन ऑलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश 

शहादा.

महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मंडळामार्फत विविध स्पर्धा परीक्षा तसेच इयत्ता बारावी नंतरच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात नीट व जेईई तसेच एम. एच.टी.सी.इ.टी.एन.डी.ए प्रवेश परीक्षा इत्यादी परीक्षांचा सराव व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून विज्ञान व गणित या विषयांसाठी नवी दिल्ली येथील सिल्वर झोन फाउंडेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते, सदर परीक्षेत इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीचे एकूण 68 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी इयत्ता अकरावीचे चार विद्यार्थी लेवल दोन साठी पात्र ठरलेले आहेत, तसेच इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी श्रावणी गणेश अहिरे, प्रथमेश चौधरी तसेच यज्ञा योगीराज पाटील या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे सुवर्ण, रजत आणि कास्यपदक पटकावले असून महाविद्यालयाच्या लौकिकात भर पाडली आहे .

ऑलिंपियाड परीक्षेची तयारी म्हणून महाविद्यालयात मोफत मार्गदर्शन पंधरवाडा आयोजित करण्यात येतो यात विविध विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. यशस्वी विद्यार्थ्यांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील ,उपाध्यक्ष जगदीश पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती जयश्री पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर भाई पाटील आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल सत्कार करीत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य प्रा.के.के. पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश आदी उपस्थित होते.
सदर परीक्षेच्या आयोजनासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मंडळाचे संयोजक प्रा. व्ही.सी. डोळे यांनी परिश्रम घेतले व त्यांना प्रा. यू.एस. पटेल, प्रा.रेखा पाटील प्रा. जयेश चौधरी तसेच प्रा.गायत्री पाटील आदींचे सहकार्य लाभले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *