
प्रगतीशील शेतकरी मनोज पवार यांना राष्ट्रीय कृषी भूषण पुरस्कार प्रदान

नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दि.28 जून रोजी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज स्मारक भवन येथे मराठा कल्याण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी मनोज यशवंतराव पवार (बापू )यांना कोल्हापूर संस्थानिक श्रीमंत राजे श्री छत्रपती शाहू महाराज व खासदार सतेज पाटील ( बंटी पाटील )यांच्या हस्ते
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व राज्य स्तरीय,राष्ट्रीय पुरस्कार वितरण करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोज पवार यांचे सुरत, धुळे नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- 0
- 0
- 0
- 0





