
तळोद्याचे ग्राम दैवत कालिका मातेची आरती नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी व योगेश चौधरी यांच्या हस्ते संपन्न
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो : – तळोदा येथील ग्रामदैवत कालिका मातेच्या यात्रेला भव्य प्रारंभ झाला असून, या पावन प्रसंगी ग्रामदैवत कालिका मातेची आरती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई योगेश चौधरी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पॅनल प्रमूख योगेश भाऊ प्रभाकर चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी उपनगराध्यक्ष सौ. शीतल लक्ष्मण पटेल, हेमलाल मगरे, नगरसेवक रामानंद शिरीषकुमार ठाकरे, कल्पेश चौधरी, गिरधर रामचंद्र सागर, खाटिक इमरान मेहमुद, प्रतिभा दिपक पाडवी, हर्षा मनोज पाडवी, गायत्री अरुण पिंपरे, नाईक लक्ष्मी विजय, अरविंद बबन प्रधान, मिराबाई राजू कोळी, शहराध्यक्ष हरीश साळुंके, अनिल पाडवी यांच्यासमवेत तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- 0
- 0
- 0
- 0





