
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केली
कोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी
धुळे, दि. 25 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : आर्थिक वर्षाअखेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देवून वार्षिंक तपासणी केली.

यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित , अपर कोषागार अधिकारी गोरख वाल्डे, नितीन नंदन, उप कोषागार अधिकारी भास्कर आंळदे, सुनिल मते , मुद्राक लिपीक शरद पवार, शेलेंद्र सिंसोद आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कोषागारातील सुरक्षा कक्षास भेट देवून उपलब्ध असलेला मुद्रांक साठा, जिल्ह्यातील एकूण शासकीय जमा व खर्चाबाबतची माहिती व तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. आर्थिक वर्षांअखेर असल्याने विविध शासकीय कार्यालयाकडून सादर होणाऱ्या देयकांचा निपटारा करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच भेटी दरम्यान जिल्हा कोषागार कार्यालयाच्या विविध विभागाची माहिती श्री.पंडित यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
- 0
- 0
- 0
- 0





