सांगली

सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

सांगली|सप्त नगरी न्युज ब्युरो

कोणत्याही स्पर्धेत यश मिळणे किंवा न मिळणे ही गौण गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. चाचा नेहरू बाल महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सर्वोत्तम कामगिरी करावी आणि इतरांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून इतर मुलेही त्यातून प्रेरणा घेऊ शकतील. या बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळेल”, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केलं.

             जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीनं शासकीय / स्वयंसेवी संस्था आणि शाळांमधील बालकांसाठी कै. दादू काका भिडे , सौ. सुंदरबाई मालू मुलींचे बालगृह निरीक्षण गृह सांगली इथं आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव सन 2025-26 चे उद्‌घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

                 यावेळी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष प्रमुख न्यायदंडाधिकारी प्रियांका करवंदे, जिल्हा महिला - बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा परिवीक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, अधिक्षक अमर भोसले, बाल कल्याण समिती अध्यक्ष निवेदिता ढाकणे, बाल न्याय मंडळाच्या सदस्य डॉ. जयश्री पाटील, डॉ. उदय जगदाळे, तुशाल शिवशरण आदि उपस्थित होते. मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या व्यासपीठाचे कौतुक करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, "चाचा नेहरू बाल महोत्सव 7 ते 9 जानेवारी 2026 असा तीन दिवस चालणार आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून आनंद घ्यावा. मुलांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालविकास विभागानं केलेल्या या प्रयत्नांचे त्यांनी विशेष आभार मानले. प्रारंभी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विविध संस्थेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाची पाहणी केली. त्यानंतर मान्यवरांनी गणित आणि रोबोटिक प्रदर्शनास भेट देऊन माहिती जाणून घेऊन मुलांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. दीप प्रज्वलन आणि आकाशात फुगे सोडून या बाल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या बाल महोत्सवात क्रीडांगणावरील सांघिक खेळ कबड्डी, खो-खो, क्रिकेट, रिले, बौध्दिक खेळ कॅरम, बुध्दिबळ, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिक गायन, सामूहिक नृत्य अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *