नंदुरबार

वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला स्थगितीच्या सूचना

वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला स्थगिती देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याचा सूचना

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा नगरपरिषद क्षेत्रातील (जि. नंदुरबार) प्रशासक काळातील वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती मिळावी अशी मागणी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निवेदनात केली आहे.
दरम्यान याबाबत नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला स्थगिती देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याचा सूचना दिली आहे.

तळोदा नगर परिषद प्रशासक काळात वाढीव घरपट्टी भरमसाठ वाढ केली आहे. या संदर्भात राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी घेत निवेदन सादर केले. विशेष बाब म्हणून घर पट्टी वाढीस स्थगिती मागणी केले. निवेदनात विनंती केली आहे. की, तळोदा नगरपरिषद ही आदिवासी बहुल क्षेत्रातील ‘क’ वर्ग नगरपरिषद आहे. या नगरपरिषद क्षेत्रात राहणारे सर्व नागरीक हे आदिवासी, कष्टकरी, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजुर आहेत. तळोदा शहर हे आर्थिकदृष्टया मागासलेले आहे. या नगरपरिषदेला उत्पन्नाचे कोणतेही मोठे स्त्रोत नाही.

प्रशासक काळात एका खाजगी यंत्रणे मार्फत शहरातील मालमत्तांचे प्रत्यक्षात भेट न देता व मोजमाप न करता पुनर्मुल्यांकन करुन कर योग्य मुल्य सुमारे 25 पट घरपट्टीत वाढ करुन अवाजवी वाढीव घरपट्टी आकारणी करण्याचा जाचक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तळोदा शहरातील नागरीकांमध्ये प्रशासनाचा विरोधात तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे.

त्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की, तळोदा नगरपरिषद क्षेत्रातील प्रशासक काळातील वाढीव घरपट्टीस विशेष बाब म्हणून स्थगिती देण्यात यावी अशी मी आपणास आंग्रहाची विनंती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. याबाबत नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला स्थगिती देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याचा सूचना दिली आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *