यवतमाळ

यवतमाळच्या ३४ संस्था-संघटनांनी ध्वनी प्रदूषण आणि लेझर लाईटबाबत प्रशासनाला सादर केली निवेदने:

यवतमाळच्या ३४ संस्था-संघटनांनी ध्वनी प्रदूषण आणि लेझर लाईटबाबत प्रशासनाला सादर केली निवेदने:

यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात पर्यावरण तसेच सामाजिक विषयांवर कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी एकत्र येत पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे

यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात पर्यावरण तसेच सामाजिक विषयांवर कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी एकत्र येत पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे

यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात पर्यावरण तसेच सामाजिक विषयांवर कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी एकत्र येत पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने नुकतीच “पर्यावरण जागृती समिती”ची स्थापना करण्यात आली आहे.

समितीच्या वतीने सहकार्य करणाऱ्या ३४ संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच नगरपरिषद यवतमाळचे मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी ध्वनी प्रदूषण आणि लेझर लाईटमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आचारसंहितेनुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

नगरपालिका प्रशासन ही या संदर्भात कार्यवाही करणारी प्रमुख यंत्रणा असल्यामुळे त्यांनी या विषयावर व्यापक जनजागृती करण्यासाठी संस्था आणि संघटनांची मदत घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, शहरात शांतता क्षेत्रे घोषित करून त्याबाबत सूचना फलक उभारावेत, असे आवाहनही करण्यात आले. या प्रसंगी विविध संस्था आणि संघटनांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *