अहिल्यानगर

उद्योगांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा

उद्योगांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा

अहिल्यानगर, दि. २५ – जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून उद्योगांना मूलभूत सुविधा देण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

​जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. ​बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, उद्योग अधिकारी श्याम बेनके, महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार, औद्योगिक संघटनांचे प्रकाश गांधी, अरविंद पारगावकर, संतोष बोथरा, नितीन हासे आदी उपस्थित होते.

​जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले , औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, प्रकाशयोजना व इतर सुविधा सुधारण्यासाठी रोड फर्निचरची कामे येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात यावीत. औद्योगिक वसाहतींमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या तातडीने हटवाव्यात. आवश्यक असल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

​तसेच, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रात रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा असून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. केडगाव औद्योगिक वसाहतीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात यावी. भाळवणी व केडगाव औद्योगिक वसाहतीतील विद्युत समस्यांची तातडीने सोडवणूक करण्यात यावी आणि औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी हवा गुणवत्ता मापन यंत्र कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

​या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

GovernmentOfMaharashtra #MaharashtraShasan #IndustrialDevelopment #MIDC #Ahilyanagar #EaseOfDoingBusiness #DistrictIndustryCentre #UdyogMitra #MaharashtraIndustry

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *