
डॉ. सुरेश थरकुडे यांना खो-खो क्रीडा कार्यमान संशोधनास कॉपीराईट
जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा)- : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यरत असलेले क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे यांना खो-खो स्पॅटीयल झोन अँड परफॉर्मन्स ॲनॅलिसिस ऑफ ॲटॅकर, डिफेंडर अँड टीम” या अभिनव आणि संशोधनात्मक विषयावर प्रतिलिप्याधिकार कार्यालयामार्फत कॉपीराईट हक्क प्राप्त झाले आहेत.
या संशोधनामध्ये खो-खो खेळातील खेळाडूंच्या हालचाली, डावपेच, विशिष्ट क्षेत्राचा वापर तसेच वैयक्तिक व संघात्मक कामगिरीचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासामुळे खेळाडूंच्या कौशल्य विकासासह संघाच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.
हे संशोधन प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा शास्त्रज्ञ व क्रीडाप्रेमींसाठी उपयुक्त ठरणार असून, खो-खो खेळाच्या क्रीडा कार्यमान विश्लेषण क्षेत्राला नवी दिशा देणारे आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक यांनी डॉ. थरकुडे यांचे अभिनंदन केले असून, जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





