नागभीड (चंद्रपूर):गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला २००९-१० मधील अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले. मात्र, या कालव्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले ते तब्बल १४ वर्षांनी, २०२४ मध्ये. अतिवृष्टीत कि.मी. २१, ३१, ३२, ३४, ३९ आणि ४३ या ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण व खोदकाम कमकुवत झाले; पण या मोठ्या नुकसानीकडे पाटबंधारे विभागाने १४ वर्षे दुर्लक्ष केले. पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील […]
विदर्भ
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
मुंबई – राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले. मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ईव्हीएममध्ये उमेदवारांचे भवितव्य कैद झाले आहे. ज्याठिकाणी मतदान झाले त्याठिकाणी स्टाँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आले आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गोंदियाच्या सालेकसा येथे ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपावरून राडा झाला […]
आरमाेरी तालुक्यात वाघ मृतावस्थेत आढळला; वडसा वन विभागात वन्यप्राणी मृत्यूचे सत्र सुरूच
गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील विहीरगाव नियत क्षेत्रात साेमवार, ८ डिसेंबर राेजी एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वडसा वन विभागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहेत. वाघाचा मृतदेह अत्यंत विकृत अवस्थेत असल्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. विहीरगाव नियत क्षेत्रात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. तेव्हा वडसाचे उपवनसंरक्षक वरुण […]
१८०० बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार
अमरावती : राज्यात सध्या २९ जिल्ह्यांमध्ये बिबट्याने उच्छाद मांडला असून त्याच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. बिबटे व मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाला ५६० कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात १८०० बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत. बिबटे व मानव संघर्ष आता नैसर्गिक आपत्ती ठरणार. महाराष्ट्रात […]
२८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली
अकोला शहरातील महेश कॉलनीमध्ये एका घरात २८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. ७ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. पण, तरुणीने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली होती, असे तपासातून उघड झाले आहे. ज्या तरुणाने पोलिसांना तिच्या आत्महत्येची माहिती दिली, त्यानेच तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मयत तरुणी […]





