कोल्हापूर

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पण डीपीडीसीतून दोन कोटी ऐंशी लाख रुपयांची वाहन खरेदी.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पण डीपीडीसीतून दोन कोटी ऐंशी लाख रुपयांची वाहन खरेदी . कोल्हापूर दि : 13 ( जिमाका ) जिल्हा पोलीस दलास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून आज राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नवीन २६ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.      यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज […]

पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. १३ : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा […]

कोल्हापूर महाराष्ट्र

शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोल्हापूर, दि. १२ (जिमाका): जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर […]

सांगली

मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा  निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी

मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा  निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 अंतर्गत येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानादरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त […]

अहिल्यानगर

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून अहिल्यानगर, दि. ११ जून :- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय शाळा १५ जून रोजी, नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘पहिला दिवस शाळेचा, एक तास खेळाचा’ या संकल्पनेअंतर्गत करेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय खेळ दिनानिमित्त द ओपनट्री फाउंडेशन […]

सांगली

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष                                   सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष                            सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न सांगली, दि. ९ (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीचा आढावा घेण्यात आला असून, पूरस्थितीच्या संभाव्य आव्हानावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन […]

कोल्हापूर

कोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देश पातळीवर आणणार – मंत्री शंभूराज देसाई

कोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देश पातळीवर आणणार – मंत्री शंभूराज देसाई कोल्हापूर दि. 5 (जिमाका) : कोल्हापूरला दक्षिण काशी समजले जाते.या शहराला अध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व आहेच तथापि पर्यटनाच्या बाबतीत या शहराला देशपातळीवर आणण्यासाठी पर्यटन विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन पर्यटन,खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात श्री देसाई यांनी पर्यटन […]

नाशिक

पालखी सोहळ्यात वारकरी, भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतचस्वच्छतेला प्राधान्य द्यावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

पालखी सोहळ्यात वारकरी, भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतचस्वच्छतेला प्राधान्य द्यावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले पालखी तळावरील अतिक्रमणे तात्काळ काढावीत भंडीशेगाव येथील सोपानकाका पालखी तळ 30 जून पर्यंत सुयोग्य करावा विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केली पालखी मार्ग व तळांची पाहणी पंढरपूर दि. 04:-(उमाका) ,आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर […]

अहिल्यानगर

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अहिल्यानगर, दि. ५ : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचे सुसूत्र नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया […]

अहिल्यानगर

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त अहिल्यानगर, दि. ३ जून :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका […]